You are currently viewing Photoshop Complete Guide for Beginners in Marathi

Photoshop Complete Guide for Beginners in Marathi

‘वेदिका एन्टरप्रायजेस’ या प्रकाशन संस्थेच्या वतीने नरेंद्र आठवले आणि सौ. सुजाता आठवले यांनी लिहिलेल्या ‘संपूर्ण फोटोशॉप’  (Photoshop Complete Guide for Beginners in Marathi) या मराठीतून माहिती सांगणाऱया संदर्भ ग्रंथाच्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. हे पुस्तक आर्किटेक्चर, फोटोग्राफी, इंजिनिअरिंग, डिझायनिंग, वेब डिझायनिंग, ऍनिमशन, डी.टी.पी., पब्लिकेशन आणि आय.टी. क्षेत्रात काम करणाऱया मराठी बंधु-भगिनींसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

 या पुस्तकात ‘संपूर्ण फोटोशॉप CS 5′ मध्ये असलेल्या सर्व नविन गुणधर्मांचा परामर्ष केलेला आहे. संगणकावरील ही एक अद्भुत अशीच प्रणाली आहे. यामध्ये अनेक लवचिक आणि शक्तिशाली टूल्स दिलेले आहेत. ज्याच्या साहाय्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचे डिझाइन तयार करता येते. तसेच फोटोचे स्कॅनिंग, एडिटिंग, कोलाज, वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी अक्षरे अशा अनेक गोष्टी आपल्याला Photoshop  प्रोग्रॅमच्या मदतीने तयार करता येतात.

यामध्ये फोटोंचे नुसते करेक्शनच करता येते असे नाही; तर कॅमेरा लेन्समुळे तयार झालेले प्रॉब्लेम्सही आपल्याला या प्रोग्रॅमच्या साहाय्याने नाहीसे करता येतात. व्हिडिओ फाइलमध्ये कलर, लाइटनिंग, फिल्टर इफेक्ट, आर्टिस्टीक इफेक्ट ऍड करता येतात. तसेच तयार केलेल्या इमेजमध्ये या प्रोग्रॅमच्या साहाय्याने ऍनिमेशनही तयार करता येते. थ्रीडी ऑब्जेक्टस, वेब इमेजेस आणि मोबाइल डिव्हाइसेससाठी लागणाऱया इमेजेसही आपल्याला यामध्ये तयार करता येतात. मात्र त्यासाठी आपल्या संगणकामध्ये ग्राफिक कार्ड असणे गरजेचे आहे.

फोटोशॉपच्या ( Photoshop) जुन्या व्हर्जनमध्ये दिलेल्या टूल्स्च्या साहाय्याने आपण फक्त स्थिर चित्र तयार करू शकत होतो. परंतु फोटोशॉपच्या या नवीन व्हर्जनमध्ये टाइमलाइनच्या मदतीने आपण बनविलेली स्थिर चित्रे एकत्र ठेऊन पाहिली असता त्या चित्रांमध्ये हालचालींचा आभास निर्माण करता येतो. यालाच ‘ऍनिमेशन’ असे म्हणतात.

व्हिक्टर ग्राफिकमध्ये बदल करण्यासाठी इलेस्ट्रेटरसारख्या प्रोग्रॅमचा वापर केला जातो. फोटोशॉपच्या  (Photoshop) जुन्या व्हर्जनमध्ये बीटमॅप इमेजेससाठी अशी लवचिकता आपल्याला मिळत नव्हती. परंतु या नवीन व्हर्जनमध्ये ‘पपेट क्रॅप’ या कमांडच्या साहाय्याने आपल्याला इमेजेस आणि ऑब्जेक्टमध्ये हवी तशी लवचिकता तयार करता येते.

फोटोग्राफर एकाचवेळी अनेक फोटो स्कॅन करतात. स्कॅन झाल्यानंतर प्रत्येक फोटो स्वतंत्र सिलेक्ट करून दुसऱया फाइलमध्ये घेऊन त्याचे करेक्शन करतात. परंतु हे सर्व फोटो वेगवेगळे करण्यासाठी प्रचंड वेळ खर्ची पडतो. त्यांची ही अडचण फोटोशॉपच्या या व्हर्जनने ‘क्रॉप ऍण्ड स्ट्रेटन’ या कमांडच्या साहाय्याने चुटकीसरशी सोडविली आहे.

संपूर्ण फोटोशॉप  या पुस्तकातील सारे विवेचन साधार तर आहेच, पण सोदाहरणही आहे, सचित्रही आहे. कोणतीही कृती करताना किंवा आज्ञा देताना आपल्याला संगणकाच्या छोटय़ा पडद्यावर काय दिसेल ते या पुस्तकात दर्शवून स्पष्टीकरण देण्यात आल्यामुळे या पुस्तकाचा उपयोग आपणास फक्त थिअरी म्हणून न होता, प्रत्यक्ष प्रॅक्टिकलसाठीही मार्गदर्शक म्हणून होणार आहे. 

 महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात असणाऱया सर्व मराठी भाषीकांनी ‘फोटोशॉप’ (Photoshop) या प्रणालीला आत्मसात करावे; या प्रणालीमध्ये मास्टर बनावे व डिझायनिंग आणि ऍनिमेशनच्या जगात आपले वर्चस्व प्रस्थापित करावे या जाणीवेतूनच हा पुस्तक प्रपंच लेखकद्वयींनी केला आहे.

 

Sampurna Photoshop (संपूर्ण फोटोशॉप) (Marathi Edition) Marathi Edition by Narendra Athavale (Author), Sujata Athavale (Author)

आर्किटेक्चर, फोटोग्राफी, इंजिनिअिंरग, डिझायिंनग, वेब डिझायिंनग, अ‍ॅनिमशन, डी.टी.पी., पब्लिकेशन आणि आय.टी. क्षेत्रात काम करणार्‍या मराठी बंधु-भगिनींसाठी फोटोशॉप प्रणालीवरील मराठीतील अत्यंत उपयुक्त असा एकमेव अद्ययावत संदर्भ ग्रंथ –

https://vedikahub.com/product/sampurna-photoshop-

Narendra/Sou Sujata Athavale

१९८८ पासून पुस्तक निर्मिती क्षेत्रात पदार्पण.  १९९९ पासून संगणक प्रणालींवर मराठीतून  लेखन आणि  प्रकाशन.  vedikahub.com या  ब्लॉगमध्ये टेक्नीकल आणि इतर विषयांवर लहानांपासून ते आजी-आजोबापर्यंत सर्वांसाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स  देत आहोत.

This Post Has 2 Comments

  1. mongoe

    mongoe xyandanxvurulmus.86K0n6J0JZq7

Leave a Reply