You are currently viewing Remove unwanted object from the image tutorial in Marathi

Remove unwanted object from the image tutorial in Marathi

Remove unwanted object from the image इमेजमधून नको असलेले ऑब्जेक्ट काढणे

एखाद्या इमेजमधून नको असलेले ऑब्जेक्ट काढून टाकण्यासाठी कॉम्प्युटरवरील फोटोशॉपसारख्या प्रणालींचा  आपण वापर करतो. त्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. परंतु आता आपले काम काही सेकंदातच तयार होणार आहे. यासाठी आपल्याला Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धीमत्ता) मधील ‘cleanup.pictures‘ या वेबसाइटचा खूप उपयोग होणार आहे. आणि आपल्या वेळेची बचत होणार आहे. इमेजमधील नको असलेला ऑब्जेक्ट कसा डिलिट करावयाचा ते आता आपण पुढील उदाहरणाच्या साहाय्याने पाहू या.

1) ‘गुगल सर्च’ मध्ये ‘cleanup.pictures’ असे टाईप करावे. ओपन होणाऱया यादीमधून वेबसाइट ओपन करावी. 

Remove any unwanted object, people or text

2) ओपन होणाऱया विंडोमधील ‘click here or drag an image file’ या ठिकाणी क्लिक करावे. ओपन होणाऱया विंडोमधून इमेज ओपन करावी. आकृतीत दाखविल्याप्रमाणे इमेज ओपन होईल.

AI website

3) त्यातील ‘continue with SD’ पर्यायावर क्लिक करावी. आकृतीत दाखविल्याप्रमाणे इमेज ओपन होईल.

AI website

4) चित्रामध्ये असणाऱया ब्रशच्या चिन्हाला क्लिक करावे आणि ब्रशची साइज निश्चित करावी. नको असलेल्या ऑब्जेक्टवरून ब्रश फिरवावा.

AI website

5) काही सेकंदातच ऑब्जेक्ट नाहीसे झालेले आपल्याला दिसेल.

AI website

6) वरच्या बाजूला असणाऱया ‘डाउनलोड’च्या बटणावर क्लिक करून इमेज डाउनलोड करावी.

अशा रितीने आपण ‘cleanup.pictures’ या वेबसाइटच्या मदतीने तासाचे काम काही सेकंदातच करू शकतो. अशाच काही उपयुक्त वेबसाइट्सची आपण माहिती घेणार आहोत. ज्याचा आपल्याला दैनंदिन जीवनात खूप उपयोग होणार आहे.

Facebook
Twitter
LinkedIn

Narendra/Sou Sujata Athavale

१९८८ पासून पुस्तक निर्मिती क्षेत्रात पदार्पण.  १९९९ पासून संगणक प्रणालींवर मराठीतून  लेखन आणि  प्रकाशन.  vedikahub.com या  ब्लॉगमध्ये टेक्नीकल आणि इतर विषयांवर लहानांपासून ते आजी-आजोबापर्यंत सर्वांसाठी उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स  देत आहोत.

Leave a Reply