‘कॉम्प्युटरचा घरचा वैद्य’ घरी आणा ! आपला कॉम्प्युटर निरोगी ठेवा ! Bring the ‘computer home doctor’ home! Keep your computer healthy!
लेखक – नरेंद्र आठवले/सौ. सुजाता आठवले
आता बहुतेकजण कॉम्प्युटर वापरतात. शाळा, घर, ऑफिस आणि प्रवासामध्ये कोठेही पाहा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर होताना दिसतो. रोजच्या रोज कॉम्प्युटरची निगा न राखल्यामुळे बऱयाच जणांना सतत अडचणी येतात. परंतु येणाऱया समस्यांकडे दुर्लक्ष करून ते आपले काम बंद करत नाही. मग एके दिवशी आपला कॉम्प्युटर पूर्ण बंद पडतो. अशी वेळ येऊ नये म्हणून दररोज फक्त पाच ते सात मिनीटे वेळ खर्च करा. आपल्या कॉम्प्युटरची योग्य निगा राखली तर त्याचा फायदा काय होतो आणि किती होतो हे आपणच आजमावून पाहा. या पाच-सात मिनीटांत काय-काय करावयाचे आहे या संबंधीच्या महत्त्वाच्या टिप्स लेखक श्री. नरेंद्र/सौ. सुजाता आठवले यांनी ‘कॉम्प्युटरचा घरचा वैद्य’ या पुस्तकात उदाहरणांसहित दिलेल्या आहेत.
कॉम्प्युटर वापरताना नेहमी येणाऱया अडचणींवर मात कशी करावयाची, त्यासाठी कोणकोणते सोपे उपाय करावेत हे लेखकद्वयींनी या पुस्तकात दाखविले आहे. उदाहरणार्थ आपला कॉम्प्युटर स्लो चालत असेल? कॉम्प्युटर ओपन अथवा बंद होण्यास वेळ लागणे, इन्स्टॉलेशन करताना येणाऱया अडचणी, प्रोग्रॅम क्लोज होत नसेल किंवा चालू होत नसेल, तसेच प्रिंटर आणि स्कॅनरमध्ये येणाऱया अडचणी वगैरे अनेक समस्यांसाठी कोणते उपाय योजावेत हे ‘कॉम्प्युटरचा घरचा वैद्य’ या पुस्तकात दिलेले आहे.
फाइल्स, फोल्डर्स आणि इंटरनेटसंबंधी येणाऱया समस्यांवर कोणते उपाय करावेत हे या पुस्तकात दिलेले आहेत. उदाहरणार्थ फाइल डिलिट होत नसेल तर काय करावे? किंवा चुकून डिलिट झालेली फाइल रिकव्हर कशी करावयाची हेही या पुस्तकात दाखविले आहे. या व्यतिरिक्त इंटरनेट चालू होत नसेल तर काय करावे? एखादी मोठी फाइल (जास्त मेमरीची) ऑनलाइन कशी पाठवावी इत्यादी सर्व गोष्टी उदाहरणांसहित या पुस्तकात दिल्या आहेत.
या पुस्तकात दिलेली माहिती सचित्र असल्यामुळे याचा उपयोग लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कॉम्प्युटरचा वापर करणाऱया सर्वांना हमखास होईल.
Recent Posts
-
Illustrator Complete Guide for Beginners in Marathi27/06/2023/0 Comments
-
President – Prime Minister – Debate02/06/2023/
कॉम्प्युटरचा घरचा वैद्य Computercha Gharcha Vidya
Marathi Edition by Narendra Athavale Sujata Athavale
कॉम्प्युटर वापरताना नेहमी येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना उपयुक्त असा मराठीतील एकमेव संदर्भ ग्रंथ